उदे गं अंबाबाई. तुझा गोंधळ मांडियेला

युवक महोत्सवात तरुणाईने घातले साकडे

 d5248-large गोंधळ कलाप्रकार सादरीकरण करताना सहभागी स्पर्धकांनी संबळ, तुणतुणे आदी संगीत वाद्यांचा वापर केला. यामुळे वातावरणात आणखी रंगत भरली. तसेच हातवारे करून दुसर्‍यांचे नाव अलिखित ‘मनकवडे’ हा प्रकारही यावेळी उत्कृष्टपणे सादर केला. युवक महोत्सवात तरुणाईने घातले साकडे धर्माबाद (शंकरराव चव्हाण रंगमंच। दि.१७ (प्रतिनिधी)
गळ्यात, हातात कवड्यांच्या माळा, अंगावर झबला, डोक्यावर पगडी असा पेहराव करून बेलभंडारा उधळत पारंपरिक गोंधळाने युवक महोत्सवात उत्साह भरला. स्पर्धकांनी ‘उदे गं अंबाबाई तुझा गोंधळ मांडियेला’ अशी साद घालत विश्‍वकल्याणासाठी अंबेचरणी साकडे घातले.
गोंधळाचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. यात गोंधळ, जागर, जोगवा या पारंपरिक कलाप्रकाराचे सादरीकरण झाले. युवक-युवतींनी केलेला आकर्षक पेहराव व डोक्यावर देवीची चौकी घेऊन रंगमंच परिसरात प्रेक्षकाभोवती फेर धरला. रात्रीची वेळ असल्याने संगीताचा आवाज, प्रेक्षकांच्या उत्साहाने लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा परिसर फुलून गेला होता. अशा वातावरणात सादरीकरण करताना कलाकारांचा विश्‍वास व उत्साह वाखाणण्याजोगा होता. लातूर येथील दयानंद महाविद्यालयातील स्पर्धकांनी देवीला आवाहन करून गोंधळ घालत जोगव्याच्या माध्यमातून तुळजापूरच्या आईचा उदो उदो केला.
‘आई गं अंबाबाई हाकेला तू धाव गं तुझा गोंधळ मांडिला’ या हाकेला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. तसेच ‘जोगवा’ या चित्रपटातील प्रसिद्ध ‘नदीच्या पल्याड आईचा डोंगर’ हा गोंधळ महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरच्या रुपेश इंगोले, गजानन अनसे, पांडुरंग शिंदे, स्वाती जयस्वाल यांनी उत्कृष्टपणे सादर केला.
एनएसबी महाविद्यालयाचे अविनाश बोबडे, सुभाष राऊत, संतोष खडकीकर, अजय चौधरी, अब्दुल साजीद यांनी वाघ्या-मुरळी हा पारंपरिक गोंधळ घातला.
बसवेश्‍वर महाविद्यालयाचे सुवर्णकार,, संतोष सोनुले, रणजित आचार्य, महेश पाटे, शांतवीर स्वामी, मधुकर पनाले, धामपा यांनी सादर केलेल्या गोंधळास प्रतिसाद देत प्रेक्षकांनी तर चक्क बसल्या जागीच गोंधळ घातला. या मंचासमोर सर्वाधिक गर्दी जमली होती.

 d5281-large 17 OCT

कुसुमांजली युवक महोत्सवात मंचावर कला सादर होत असताना आपल्या संघाला युवतीही टाळय़ा वाजवून प्रतिसाद देत होत्या.

 

 d5273-large 17 Oct 2

शाहिरी सादर करताना कलावंत