d5275-large a

Day Two

आपल्या कलाप्रकाराच्या सादरीकरणाची वेळ समीप येऊ लागताच वेशभूषा व मेकअप करण्याची लगबगही वाढते. लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्रांगणातील हे त्याचे बोलके दृश्य.

  (शंकरराव चव्हाण मंच)
डफाचा आवाज, पेटीचे मधुर स्वर आदी वाद्यांच्या गजरात अस्सल लोकगीतांनी युवक महोत्सवात धमाल उडविली. ‘गोर्‍या गोर्‍या गालावरी चढली लाजेची गं लाली’, पोरी नवरी आली, यासारख्या अवखळ, श्रृंगारिक लोकगीतांना उपस्थितांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
कुसुमांजलीच्या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात लोकगीतांनी चांगलीच रंगत भरली. युवतींनी मराठमोळा पेहराव करुन वातावरण निर्मितीत भर पाडली. युवकांनी डोक्यावर पागोटा, धोतर, हातात काठी तर खांद्यावर घोंगडी घेतल्याचे ग्रामीण चित्र रंगमंचावर पहावयास मिळाले. लोकगीतांचे विविध प्रकार सादर झाले. यात भोकरच्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाची योगिता सोळंके, राधा कंधेवाड, कृष्णा गव्हाडे, भीमकिर्ती तारु, सुरेश मेहनतकर, संदीप गजभारे यांनी मंचावर प्रेतयात्रा आणून ‘गेली.. माझी सख्खी बायको गेली’ हे गीत सादर केले. तर तेवढय़ाच दमदार पद्धतीने महेश भूमकर या गायकाने गीतामध्ये जीव भरला. शंकरनगर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे ज्ञानेश्‍वर जाधव, किरण तुरेराव, दिलीप कोंढया, व्यंकट वडजे, शेषराव गावंडे, गौतम गावंडे, संतोष तसमते यांनी ‘रानमाळावर राखीतो मेंढर’ हे गीत सदर करुन रानमाळाची सफर घडविली. तर अभिनव कॉलेज, लातूर येथील कमल गुळवे, श्‍वेता कुलकर्णी, मयुरी बिरादार, पल्लवी माने, शीतल जगताप, मधुमती लोंढे यांनी ‘पाणी जाऊ दे पाटाला, बैल जुंप रे रहाटाला’ या लोकगीतावर मंचासमोर बसलेल्या तरुणांनी ठेका धरला.
वसमत येथील बहिर्जी महाविद्यालयातील र्शावण कदम, राजकुमार सोनटक्के, प्रकाश कांबळे, राजर} खंदारे, स्मृती यादव, प्रीती दणक यांनी हुंडा प्रथेवर आधारित ‘पैसा देणं-घेणं पटत नाही मनाला, हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला’ हे विडंबनात्मक गीत सादर केले.
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील कांतराव रापल्ले, सज्जन लोकडे, अविनाश मोकाडे, लक्ष्मीबाई चातम्मा, लतीका जोशी यांनी ‘देव धनगरवाड्यात घुसला’ लोकगीत सादर केले. नांदेड येथील व्हीआयटीएमचे विजय कपाळे, अजय भंडारे, महेश गायकवाड यांनी ‘आम्ही ग्यान पाटवर सूर्यरायाला विनवतो, हाती हत्यार उचलतो, पाटी पेन्सील उचलतो’ हे गीत सादर केले.
बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट येथील वैशाली मंगाम, किरण गोरेकर, प्रकाश कांबळे, संदीप जाधव, चंद्रकांत गायकवाड, मालगन अडेलू यांनी ‘आता तुम्हीच सांगा पावनं’ हे गीत सादर केले. बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी येथील रावसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाचे संदीप भुरे, मिलिंद मांजरमकर, साईनाथ चपळे, हनुमंत कोलूरकर, कल्पना श्रीरामे, स्वप्ना करेवाड यांनी स्त्रीभ्रूण हत्येवर गीत सादर केले. धुंडा महाराज देगलूरच्या अमृता कुलकर्णी, अमृता जोशी, मोहिनी गोळे, पुष्पा सोनकांबळे, सचिन टोंपे, सूर्यकांत पैतूलवार यांनीही र्शंृगारिक लोकगीत सादर केले.
शाहू महाविद्यालय लातूरच्या शीतल पवार, अंजली गाडेकर, बेगम कासीम, वैशाली कांबळे, अंजली जोशी यांनी ‘बहुरुपी आला.. लग्नाला चला’ या लोकगीताने कार्यक्रमात रंगत भरली. एनएसबी नांदेडच्या अश्‍विनी पुजारी, गर्जना गवारे, रुक्मिणी शिंदे, उर्मिला मुंगल, कल्याणी सोनके, गीतांजली काळे यांच्या मंगळागौरीही चांगलीच भावली. नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजचे गौरव सरोदे, किर्तीकुमार सोनकांबळे, सौरभ लोलगे, पूजा सोनकांबळे, पल्लवी गावंडे यांनी ‘अगं ये अंबराईत शिरु’ सादर केले.
एमएजीएम कॉलेज अहमदपूरचे सरिता अडसूळ, रार्जशी पाटणकर, पूजा रुईकर, मंजुश्री मातने, आकाश भादरे, ऋषीकेश शेळके यांनी ‘जिवाचा मैतर ढवळ्या अन् पवळ्या शेतात घेऊन चाल रं’ हे शेतकरी गीत सादर केले. दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथल प्राची बहेवार, प्रीती बनगरे, असावरी सोनमोहेकर, भाग्यश्री इंगळे, वैभव माने यांनी ‘नवरी आली गं’ चे सादरीकरण केले.

 d5276-large c

धर्माबाद येथील युवक महोत्सवात मूक अभिनयातही विविध महाविद्यालयातील संघांनी आपली कला सादर केली. असाच एक संघ आपली अदाकारी दाखविताना.